विकृतीचा कळस! पुण्याहून परभणीकडे निघालेल्या बसमध्ये महिलेची प्रसूती, बाळाला चक्क खिडकीतून फेकलं…


पुणे : पुण्याहून परभणीकडे येत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्समध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस परभणीच्या पाथरी सेलू महामार्गावरून पाथरी तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर एका जोडप्याने जन्मलेलं बाळ बसमधून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिका मिलिंद ढेरे आणि अल्ताफ मेहुद्दीन शेख हे दोघेजण दीड वर्षापासून पुणे येथील चाकण परिसरात राहत होते. आम्ही दोघं नवरा बायको आहोत, असा दावा त्यांनी केला आहे.पुण्याहून निघालेल्या या जोडप्याने मंगळवारी सकाळी एका बाळाला जन्म दिला. पण पाथरीपासून दोन किलोमीटरवर देवनांद्रा शिवारात कॅनॉल जवळ त्यांनी बाळाला रस्त्यावरच फेकून दिलं.उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना फोन लावला अन् झालेला घटनाक्रम सांगितला.त्यानंतर बसचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान नवजात बाळाचे पालन पोषण न करण्याच्या उद्देशाने या दोघांनी या नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, फेकून दिल्यानंतर बाळाचा मृत्यू झाला होता, असं देखील समोर आलं आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!