विकृतीचा कळस! 16 वर्षीय विद्यार्थ्यांवर अत्याचार, चाळीशीतील शिक्षिकेच्या डॉक्टर मैत्रिणीस अखेर अटक


मुंबई : गेल्या काही दिवसापूर्वी मुंबईतील एका नामांकित शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा असणारी घटना घडली होती. 16 वर्षीय विद्यार्थ्यांवर एका शिक्षिकेने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक ही करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर आली आहे. 40 वर्षीय शिक्षिकेच्या डॉक्टर मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. डॉक्टरने विद्यार्थ्याला अँक्झायटी कमी करणारी औषधं दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी डॉक्टर महिलेला पश्चिम बंगालमधील तिच्या गावी शोधून अटक केली. कोर्टाने तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात आरोपी असलेल्या 40 वर्षीय शिक्षिकेला याआधी अटक झाली होती, मात्र तिला जामीन मंजूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिका आणि डॉक्टर मैत्रिणी आहेत.16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात शिक्षिकेला जून महिन्यातच बेड्या ठोकण्यात आल्या होत्या, परंतु गेल्या आठवड्यात तिला जामीन मिळाला. तर तिची डॉक्टर मैत्रीण मुंबईतून पळून गेली होती. पोलिसांनी तिला तिच्या गावी, पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथे शोधून काढले आणि 19 जुलै रोजी तिला अटक केली.
पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले आणि मुंबईला आणण्यासाठी परवानगी मागितली. तिने 23 ते 30 जुलै दरम्यान मुंबई पोलिसांना शरण यावे, असा सशर्त जामीन न्यायालयाने तिला दिला. त्यानुसार, ती मंगळवारी मुंबई पोलिसांना शरण आली. पोलिसांनी तिला अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाला सांगितले की, आरोपी डॉक्टरला पोलीस कोठडी द्यावी. मात्र न्यायालयाने डॉक्टरला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

दरम्यान या प्रकरणात, डॉक्टरने विद्यार्थ्याला जी गोळी दिली, ती अँक्झायटी कमी करणारी होती. त्यामुळे मुलाला प्रतिकार करणं कठीण गेलं असेल, असा अंदाज आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!