महाराष्ट्र हादरला! एकाच कुटुंबातील ४ जणांचा भयंकर शेवट, घटनेने उडाली खळबळ…

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील जवळा येथील लखे कुटुंबातील चार सदस्यांचा एकाच वेळी मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

या कुटुंबातील दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली उडी मारून जीवन संपवलं, तर त्यांचे आई-वडील घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात राहणाऱ्या लखे कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. बजरंग रमेश लखे (वय २२) आणि उमेश रमेश लखे (वय २५) या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुसरीकडे, त्याच कुटुंबातील वडील रमेश होनाजी लखे (वय ५१) आणि आई राधाबाई रमेश लखे (वय ४४) हे दोघेही त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. एकाच वेळी घडलेल्या या घटनांमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मृतदेह सापडताच पोलिसांनी घर आणि परिसर सील करून पंचनामा केला.
मृत उमेश लखे हा मनसेचा मुदखेड तालुक्याचा माजी उपाध्यक्ष होता, अशी माहिती समोर आली आहे. तो सामाजिक कार्यातही सक्रिय होता, त्यामुळे त्याच्या मृत्यूने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे. लखे कुटुंबाचा कोणाशी वाद होता का, आर्थिक अडचणी होत्या का, की कौटुंबिक तणावातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
