दारूमुळे सरकारची तिजोरी झाली फुल्ल, आकडेवारी वाचून समजेल सरकारसाठी दारू किती महत्वाचीय…
पुणे : सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कशाची विक्री होत असेल तर ती दारू आहे. दारूच्या माध्यमातून मोठा कर सरकारला मिळतो. दारू पिऊ नका ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. असे म्हटले जाते. मात्र ती सरकारच्या दृष्टीने महत्वाची आहे.
महाराष्ट्र शासनाने दारू विकून घसघशीत कमाई केली आहे. हा आकडा खूपच मोठा आहे. दारूच्या विक्रीत एका वर्षात 23% विक्रमी वाढ झाली असून महसुलात 25% वाढ झाली आहे. राज्यात 2021-22 आणि 2022-23 या कालावधीत दारूच्या विक्रीत 23% वाढ झाली आहे.
यामुळे ही आकडेवारीच सगळं काही सांगून जात आहे. किमतीत वाढ होऊनही गेल्या अनेक वर्षात ही सर्वात मोठी वार्षिक वाढ झाली आहे. राज्याला विक्रमी रु. 21,550 कोटी उत्पादन शुल्काचा फायदा झाला, जे महसुलात जवळपास 25% ची मोठी वाढ झाली आहे.
यामुळे लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा सर्वात आधी दारूची दुकाने का उघडली याचा अंदाज येईल. बिअर आणि वाईन विक्रीला उदारीकरण करण्याच्या राज्याच्या धोरणामुळे, विशेषत नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये बिअर आणि वाईनच्या उपलब्धतेत सुधारणा झाली आहे.