लाडक्या बहिणींसाठी सरकारच मोठं गिफ्ट! ‘या ‘जबरदस्त योजनेतून मिळणार आता 24 लाख रुपये, पात्रता काय असणार?

पुणे : महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर अनेक नवनवीन योजना सरकारकडून आणल्या जात आहेत. आता ग्रामीण भागातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला चालला देतानाच महिला बचतगटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा एक जबरदस्त योजना आणली आहे. ज्यातून तब्बल 24 लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.

सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर आता ग्रामीण भागातील महिलांसाठी एक अनोखी योजना आणली आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक लाभ होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गावपातळीवर कृषी अवजार बँका स्थापन करण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे.या योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत. तसेच महिला बचत गटांसाठीही उत्पन्नाचे नवं साधन निर्माण होणार आहे.
या योजनेंतर्गत पात्र महिला बचतगटांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कमाल 24 लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील गटांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिला बचत गटांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना बँक खात्याचे तपशील तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागेल. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.