सरकार वाचले पण शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका…


मुंबई : काल 16 आमदारांच्याबाबत मोठा निर्णय दिला गेला. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असताना न्यायालयाने शिवसेनेवरील हक्कावरून मोठे विधान केले आहे. ‘मीच खरी शिवसेना’ असा दावा कुणीही करू शकत नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

यामुळे आता शिवसेना कोणाची ? हा प्रश्न नव्याने निर्माण होत आहे. या शिवसेनेच्या वक्तव्यावरून एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मनाला जात आहे. यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

तसेच कोर्टाने म्हटले आहे की, कोणताही राजकीय गट अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव मिळवण्यासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही, यामुळे भविष्यात अनेक घडामोडी घडू शकतात. तसेच कोर्टाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना झाप झाप झापल आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेले निर्णय चुकीचे आहेत. भगतसिंह कोश्यारींनी बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंना दिलेले आदेश चुकीचे आहेत. राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती, असे कोर्टाने म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!