अप्पर तहसिल कार्यालय लोणीकाळभोरचे संपूर्ण कामकाज १५ ऑगस्ट पासून लोणीकाळभोर येथे सुरू होणार; आमदार ज्ञानेश्वर कटकेंची लोणीकाळभोर येथील लोकशाही दिन कार्यक्रमात माहिती…


उरुळीकांचन : अप्पर तहसिल लोणीकाळभोर कार्यासाठी प्रशासकीय पातळीवर पद निर्मितीसाठी महसूल प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात येणार असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी चालू अवस्थेत कार्यालय लोणीकाळभोर येथे संपूर्ण कामकाजासाठी कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती शिरुर-हवेलीचे आमदारज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाअंतर्गत मंगळवार (दि.१७ )कदमवाकवस्ती येथे लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकशाही दिन कार्यक्रमा अंतर्गत सर्व प्रशासकीय विभागांशी निगडीत सर्व नागरीकांची समस्यांची सोडवणूक आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या माध्यमातून प्रशासनाकडून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने, अप्पर तहसिल दार तृप्ती कोलते -पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे बाजार समिती संचालक प्रशांत काळभोर , कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच नंदूपाटील काळभोर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत शासनाने जनतेच्या प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. प्रत्येक मंडळ स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करुन नागरीकांची समस्या सोड – विली जाणार आहे. नागरीकांची शासन स्तरावर अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन होत असून नागरीकांची प्रलंबित आहे पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असून नागरीकांनी अधिक संख्येने या उपक्रमात सहभाग घेऊन समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान या लोकशाही दिन कार्यक्रमात एकून विविध विभागांशी एकूण १२० नागरीकांनी तक्रारी , अर्थ व सूचना स्वरुपात कामे मार्गी लागली आहेत. या कामांत.महसुल – ४७ पुरवठा – २१, संजय गांधी योजना -१४,ग्रामपंचायत विभाग – १०, महावितरण – ८ सार्वजनिक बांधकाम विभाग – ५ इतर- 15 अशी कामे मार्गी लागली आहे. हवेलीत उरुळीकांचन, थेऊर लोणीकाळभोर व वाघोलीत या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!