भोंदू खरातने राजकीय नेत्यांचे हजारो कोटी परदेशात पाठवले!! रोहित पवारांच्या वक्तव्याने उडाली खळबळ…

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंदू खरात महाराज चर्चेत आला आहे. त्याने अनेकांना फसवलं असून अनेक महिलांवर अत्याचार केले आहेत. तसेच त्याचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले आहे. असे असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

यामध्ये रोहित पवार म्हणाले, भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून Money Laundering करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे.
खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे nexus आहे, त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे.

असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा, देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. आता येणाऱ्या काळात अजून काय प्रकरणे बाहेर येणार हे लवकरच समजणार असून सध्या याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, भोंदू खरात प्रकरणी अनेक राजकीय नेते अडचणीत आलेत आहेत. याबाबत महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे अनेकांची चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. याबाबत तपास यंत्रणा तपास करत आहे.