मोठी बातमी! भोंदू कॅप्टन अशोक खरातच भांडफोड करणारा अंकशास्त्र पोलिसांच्या जाळ्यात; अनेक गुपिते उघडण्याशी शक्यता…

नाशिक : नाशिक येथील तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत रोज अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून यामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होतो. तसेच अनेकही काही राजकारणी मंडळीचे खरासोबत संबंध असल्याचे बोलले जात आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पण, त्यांचे हे काळ कृत्य त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नीरज जाधव या युवकाने बाहेर आणल्याचा संशय आहे. अखेरीस कॅप्टन खरातचे बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नीरज जाधव हा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. त्यानंतर आता नाशिक क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

शिर्डी येथे नीरज जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला मॉर्फ केलेल्या व्हिडिओंचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याच्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान, नीरज जाधव यानेच कॅप्टन खरात यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
100 हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडिओ…
तसेच, या प्रकरणात 100 हून अधिक महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नीरज जाधव हा अशोक खरात यांच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्याने खरात यांच्या नकळत कार्यालयातील सुमारे 58 सीसीटीव्ही व्हिडिओ मिळवल्याचे समोर आले आहे. यानंतर नीरज जाधवने अशोक खरात यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.
त्याने यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, अशोक खरात यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, नीरज जाधवने पीडितांच्या मदतीने पुन्हा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शिर्डी येथील काही महिलांना मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. नीरज जाधव हा आपल्याला धमकावत असल्याची तक्रार काही महिलांनी अशोक खरात यांच्याकडे केल्याची माहितीही समोर आली आहे.
यानंतर अशोक खरात यांनी संबंधित पीडित महिलांना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नीरज जाधवकडून आणखी एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नाशिक येथील पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.