महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप असलेल्या जयकुमार गोरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी एवढंच…


मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत. त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापले आहे.

या महिलेला जयकुमार गोरे यांनी अश्लिल फोटो पाठवल्याचा दावा राऊतांनी केला असून याप्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे. दरम्यान, आरोप प्रत्यारोप होत असताना आता जयकुमार गोरे यांनी आज विधानभवनातून माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.

जयकुमार गोरे म्हणाले, २०१७ साली एक गुन्हा दाखल झाला होता. २०१७ साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला.

त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे, त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता. आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार करत विरोधकांनी सहा वर्षांपूर्वीचं हे प्रकरण पुन्हा उकरून काढलं, असं ते म्हणाले.

या देशात लोकशाही आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला ( २०१९) आता सहा वर्ष झाली आहेत. आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा, याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असे मला वाटत.

माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाला, ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोचवलं, त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करू नये, असे गोरे म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!