सोरतापवाडीत ग्रामीण भागातील पहिला ‘पारंबी कलादालन’ महोत्सव ; महिलांना मिळणार थेट व्यावसायिक व्यासपीठ ; महोत्सवातून स्वावलंबी व आत्मनिर्भरतेकडे महिलांचे पहिले पाऊल ….

उरुळी कांचन :महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याचा दृष्टीकोन बाळगुन त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने त्यांना व्यवसायात उत्तुंग भरारी मिळावी व कर्तृत्व संधी मिळावी या उद्देशाने सोरतापवाडी (ता.हवेली )येथे जेके फाऊंडेशन व सोरतापवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्तपणे’पारंबी कलादालन’ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

गावातील महिला बचत तसेच वैयक्तिक स्वरुपात महिलांना याउपक्रमाद्वारे होतकरू व्यावसायिक म्हणून सहभागी होण्याची संधी
देण्यात आल्याची माहिती आयोजक शितल जयप्रकाश चौधरी,यांनी दिली आहे. भीमथडी व कृषी प्रदर्शन या धर्तीवरच हा ‘पारंबी कलादालन’हा महोत्सव रविवार (दि.२८) रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात गावातील दुर्लक्षित महिलांना त्यांच्या हक्काचे,व्यासपीठ मिळून देण्यासाठी त्यांच्या खाद्यपदार्थ, वस्त्रे, विणकाम, हातमाग तसेच खेळणी अशा विविध कलेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केले आहे.या महोत्सवात महिला बचतगट व महिला स्टॉलच्या माध्यमातून आपल्या वस्तू मांडणार आहे. दुपारी ४ ते रात्रीपर्यंत हा उपक्रम पसंतीस उतरणार आहे.

ग्रामीण भागात पहिल्यांदाच गाव पातळीवर महिला सक्षमीकरण व व्यावसायिक प्रोत्साहानासाठी हा महोत्सव होत असून महोत्सवातून अर्थिक उलाढालीपेक्षामहिलांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना व्यावसायिक वाटचालीत प्रोत्साहन देणे असून हा उद्देश महोत्सवाचा असून गावची अस्मिता जोडणे व ध्येयाप्रती कटीबद्धता राखणे हा मूळ उद्देश महिला ठेवणार आहेत .
