सिनेसृष्टी हादरली! प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ५४व्या वर्षी निधन, सर्वत्र शोककळा..


मुंबई : ‘सन ऑफ सरदार’, ‘आर… राजकुमार’, ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकुल देव यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर मुकुलला चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुकुल देव स्वतः एक सुप्रसिद्ध अभिनेता होता. तसेच, तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राहुल देवचा भाऊ होता. मुकुल देवनं अनेक गाजलेल्या टेलिव्हिजन सीरिअल्समध्येही काम केले आहे.

मुकुल देव यांचा जन्म १७ सप्टेंबर १९७० रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर, टीव्ही व्यतिरिक्त, त्यांनी हिंदी तसेच पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषेतील ६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

मुकुल देव शेवटचा ‘अँट द एंड’ या हिंदी चित्रपटात दिसलेला. तो अभिनेता राहुल देवचा भाऊ होता. मुकुल देवचा जन्म नवी दिल्ली येथे जालंधरजवळील एका गावात पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरी देव हे असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस होते.

मुकुल देव यांची जवळची मैत्रीण दीपशिखा नागपालनं सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुकुल देव सोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिनं लिहिलंय, ‘RIP’. तसेच, अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीनं चाहते आणि अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!