पुण्यातील राजकारणात ठसा उमटवणाऱ्या महिला आमदाराच निधन; कोण आहेत रूपरेखा ढोरे?


पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना दुसरीकडे मावळ तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या आणि पहिल्या महिला आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपलेखा खंडेराव ऊर्फ दादासाहेब ढोरे (वय ७६) यांचे काल निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

रुपलेखा ढोरे यांची राजकीय कारकीर्द?

रुपलेखा ढोरे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली. 1993ते 1995या कालावधीत त्यांनी मावळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळली.1195च्या विधानसभा निवडणुकीत रुपलेखा ढोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला निर्णायक वळण मिळाले. त्या वेळी त्यांनी आणि त्यांचे पती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खंडेराव ढोरे यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रभावी नेते आणि ज्येष्ठ राजकारणी मदनशेठ बाफना यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.या विजयासोबतच रुपलेखा ढोरे मावळ तालुक्यातील पहिल्या महिला आमदार ठरल्या,तसेच भाजपच्या पहिल्या आमदार होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता.

मावळच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या रूपलेखा ढोरे यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, पुतणे तसेच नातवंडांचा मोठा परिवार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!