शेतकऱ्याला सनी देओल ओळखूच आला नाही, नंतर कळाले तेव्हा शेतकऱ्याला धक्काच बसला…!


मुंबई : सनी देओल हा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. सनी देओलने 5 मार्च रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सनी देओल बैलगाडीवर बसलेल्या शेतकऱ्याशी बोलत होता. मात्र, विशेष बाब म्हणजे तो सनी देओलशी बोलत असल्याचे शेतकऱ्याला माहीत नव्हते.

यावेळी शेतकरी म्हणतो, ‘तू सनी देओलसारखा दिसतोस.’ यावर अभिनेता म्हणाला, की तो सनी देओलच आहे. हे ऐकून शेतकरी पुरता हैराण झाला. सनी सध्या अहमदनगर, महाराष्ट्र येथे त्याच्या गदर 2 चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

सनी देओलला आधी ओळखले नाही म्हणून शेतकऱ्याने त्याची माफी मागितली आणि सांगितले की तो त्याचे वडील धरमजी यांचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर पाहतो. सनीने सांगितले की, हे सर्व बघून त्याला त्याचे गाव आठवते. हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत सनीने लिहिले की, ‘अहमदनगरमध्ये गदरच्या शूटिंगदरम्यानची घटना’

गदर 2 बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 11 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा 2001 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट गदरचा सिक्वेल होता. मागील चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाचेही दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या अॅनिमल आणि विवेक अग्निहोत्रीच्या ‘द वॅक्सीन वॉर’शी टक्कर होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!