मुंबईत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! माजी नगरसेविकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई : सध्या ठाकरे गटातील अनेक बडे नेते तसेच कार्यकर्ते देखील शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
असे असताना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते.
शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत शिरूर तालुक्यात ३३ हजारावर लाभार्थ्यांना लाभ
यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलेल जात आहे. गुरूवारी अश्विनी माटेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईमधील चांदिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश झाला.
मटण केले नाही म्हणून पतीकडून पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना
यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मोठे आव्हान असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.