राज्य महसूल विभागाच्या पारदर्शकपणाचे अखेर ठरले ढोंग! जिल्हा व हवेलीत भूमि अभिलेखपदासाठी बदल्यांत मोठे अर्थिक ‘टेंडर’ निघाल्याची चर्चा…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : भूमी अभिलेख विभागात पुणे व हवेली भूमिअभिलेख पदांवर एकाच वेळी नियुक्त्या झाल्याने या नियुक्त्यांची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यात यापूर्वी काम केलेल्या एका अधिकाऱ्याची जिल्हा भूमिअधिक्षक तर जिल्ह्यातील एका तालुक्यात मुदतपूर्व अधिकाऱ्याला हवेली उपअधिक्षकपदाचा श्रीखंड दिल्याने राज्यात पारदर्शकेतेचे धडे देणाऱ्या राज्य महसूल व वन विभागात काही आलबेल नसल्याचे या नियुक्त्यांवरून स्पष्ट झाले आहे.

पुणे जिल्हा अधीक्षक प्रभाकर मुसळे व हवेली उपअधिक्षक विकास गोफणे यांना मुदतपूर्व बदल्यांची लॉटरी लागली आहे.एकीकडे राज्यभरातील भूमी अभिलेखचे उप अधीक्षक व जिल्हा अधीक्षक यांच्या नियमित बदल्या अद्याप प्रलंबित असताना पुण्यात मुदतपूर्व चा लाभांश दोन लाभार्थी अधिका-यांना मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या भरतीत जिल्ह्यात सर्वाधिक टेंडर उघड्याल्याची
जोरदार चर्चा भूमि अभिलेख विभागात रंगली आहे.

पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक सुर्यकांत मोरे यांची चौकशी व उपसंचालकपदी पदोन्नती तसेच हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक अमर पाटील यांचेवर गुन्हा दाखल होऊन निलंबन झाले आहे. त्यामुळे भूमी अभिलेखच्या पुण्यामधील भ्रष्ट्र कारभारावरून संपूर्ण राज्यभर आरोपांची राळ उडाली होती.त्यातच हवेलीचे उपअधिक्षक गोफणे व पुणे जिल्हा अधीक्षक मुसळे यांच्या मुदतपूर्व नियुक्तीच्या बदली प्रक्रियेवरुन प्रोटोकॉलची चर्चा रंगली आहे.

गोफणे एका वर्षाच्या आत हवेलीत बदली..

उपअधीक्षक विकास गोफणे यांनी पुरंदर तालुक्यात चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे. त्यानंतर त्यांची पुरंदर मधून भोर तालुका उपअधिक्षक म्हणून बदली झाली होती. भोरमध्ये त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच जवळपास एक वर्षाच्या आतच त्यांची हवेली भूमी अभिलेख कार्यालय उप अधिक्षक पदी नियुक्ती झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!