निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालंय! निकाल लांबणीवर पडताच बड्या नेत्याने सगळंच काढलं…

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगूल वाजला खरा पण नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीतील सावळ्या गोंधळावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंपासून ते इतर अनेक नेत्यांनी आयोगावर तोंडसूख घेतले आहे.
त्यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर निवडणूक आयोगाचे मोजक्या शब्दात चांगले माप काढले. त्यांनी धारधार शब्दांची फुटपट्टीच लावली. त्यांनी निवडणूक आयोगाचा अशा शेलक्या शब्दांनी समाचार घेतला.
राज्य निवडणूक आयोग, मला वाटतं की त्यांच्या अकलेची दिवाळे निघाले असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या मात्र एवढा गोंधळ आणि पोरखेळ कधीच झाला नव्हता, मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रात हा निवडणुकीचा धिंगाणा दिसतोय.

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअंतर्गत त्यावेळी कोणाच्या दबावात घाईघाईत तारखा घोषित केल्या. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की 50% च्या वर कुठले आरक्षण जाता कामा नये, असं असताना निवडणूक आयोगाने 50% च्या वर आरक्षणाच्या मर्यादा पाळल्या नाहीत, असा शब्दात त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचा समाचार घेतला.

सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून निवडणुका घेत आहोत, या सगळ्या लोकांना वेठीस धरणे, सात- आठ वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि त्याही व्यवस्थित न करणे यासाठी राज्य निवडणूक आयोग सोबत राज्य सरकारही जबाबदार आहे. उद्या ईव्हीएममध्ये छेडछाड झाली तर कोण जबाबदार? ईव्हीएम हॅक करता येतात, करा तुमच्या मनाप्रमाणे, निवडणुका घेताच कशाला? भाजपच्या लोकांना विजयी झाले म्हणून घोषीत करा असा जबरी टोला त्यांनी लगावला. आता अठरा दिवस जे मिळत आहेत. यातून लोकांचा विश्वास कसा राहील, त्यामुळे या सर्व प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि राज्य सरकारही दोषी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
या दोघांच्या सरकारचे लोक नेते जे बोलत आहेत, सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग झाला आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाचे ज्ञानेश्वर यांनी सांगितला आहे जगात भारताच्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शीपणे होतात. हुकमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे हेच दिसतय, तारखा पुढे ढकलने निवडणूक आयोगाचा अपयशय आणि राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
