राष्ट्रवादी दादांची की साहेबांची? ‘या’ दिवशी होणार फैसला, ‘या’ बेड्या नेत्याचे मोठे विधान..
मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार यांची की शरद पवार यांची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने अजूनही दिला नाही. यावर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.
30 सप्टेंबरनंतर सुनावणी होईल, आमच्याकडे बहुमत असल्याने आम्हाला चिन्ह मिळेल, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यामुळे शरद पवार यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, काही आमदार कमकुवत आहेत, असा दाखवण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न सुरु आहे. परंतु आमचे सर्व आमदार ताकतवर आहेत, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. यामुळे निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या पक्षात फूट पडली नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
प्रत्यक्षात मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यावर सगळं गणित अवलंबून आहे. हा निर्णय लवकरच होईल.