धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याचा आढळला मृतदेह; कोरेगाव परिसरातील घटना


Pune crime : पुणे पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव परिसरातुन समोर आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दत्तात्रय कुरळे असे या मृतदेह आढळलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात दत्तात्रय कार्यरत होते. त्यांचा मृत्यू नेमका काशामुळे झाला याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही, या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, दत्तात्रय कुरळे या पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!