लेकीला पायलट व्हायचं होतं; वडिलांनीही दिली साथ, पण….,पुण्यातील ‘त्या’ कुटुंबासोबत घडलं भयंकर

पुणे : पुण्यातील एका वडिलांची. आपल्या मुलीनं आकाशाला गवसणी घालावी, वैमानिक (पायलट) होऊन नाव कमवावं, असं पुण्याच्या चहोली परिसरातील बिरनारायण सिंग यांनाही वाट

आपल्या मुलीचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिवाचं रानकेले . मात्र, याच स्वप्नाचा फायदा घेत एका भामट्याने या कुटुंबाला तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ही फसवणूक ६ एप्रिल २०२४ पासून २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली. आरोपी शरणगौड (रा. कर्नाटक) याने बिरनारायण यांचा विश्वास संपादन केला. तुमच्या मुलीला कर्नाटक येथील एका नामांकित महाविद्यालयात पायलट कोर्ससाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखवले.

५ लाख ४५ हजार रुपये उकळले…
या संपूर्ण कोर्ससाठी ५० लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्याने टप्प्याटप्प्याने बिरनारायण यांच्याकडून ५ लाख ४५ हजार रुपये उकळले. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी वडिलांनी पै-पै जमा करून ही रक्कम आरोपीला दिली. मात्र, पैसे घेऊनही प्रवेश मिळत नसल्याचे पाहून सिंग यांना संशय आला. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी फक्त तारखा देत होता.
फसवणुकीचा गुन्हा दाखल…
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिरनारायण सिंग यांनी मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पोलिसांत धाव घेतली. दिघी पोलिसांनी या प्रकरणी शरणगौड विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एजंटच्या सांगण्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये देण्यापूर्वी पालकांनी महाविद्यालयात जाऊन खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.