माळीणची पुनरावृत्ती ! रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर ६० ते ७० घरांवर दरड कोसळली, बचाव कार्यात मोठे अडथळे !!


मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शालगड वाडीवर दरड कोसळली असून काही नागरिक सुखरूप वाचले तर काही अद्यापही दरडीखाली अडकले. अनेक जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माळीण गावावर दरड कोसळून सुमारे अडीचशे जण ठार झाले होते. त्याची पुनरावृत्ती म्हणजे रायगड जिल्ह्यातील दुर्घटना असे मानले जात आहे.

मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. ही ५० ते ६० घरांची वस्ती असून इर्शालगड डोंगरावरील काही भाग कोसळल्याने जीवितहानी झाली आहे.

मुसळधार पाऊस पडत असताना ही दुर्घटना घडली. रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यानची ही घटना असून सविस्तर माहिती लवकरच अपेक्षित आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इर्शाळवाडी इथे गावावर दरड कोसळली. अनेक जण गाडले गेल्याची भीती. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या च्या (NDRF) दोन टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या असून आणखी दोन टीम्स रवाना झाल्या आहेत. पोलिसांकडून मदत‌ व बचावकार्य सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!