१९ डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा ठरला खोटा, आता पृथ्वीराज चव्हाण आज काय म्हणाले?


नवी दिल्ली : देशाचा पंतप्रधान १९ डिसेंबर रोजी बदलणार आहे. देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस असेल, असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा अद्यापतरी खरा ठरलेला नाही.

आज (२० डिसेंबर) पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी देशाचा पंतप्रधान बदलणार असल्याच्या विधानावर विचारले असता मला ट्रोल करताय, याबाबत मला काहीच हरकत नाही. अमेरिकेत ज्या घडामोडी घडताय, त्यावरुन पुढच्या काही दिवसांत भारतीय राजकारणात खूप मोठा परिणाम होईल, असं मी म्हटलं होतं.

जेफ्री एपस्टीन मोठं सेक्स रॅकेट चालवत होता.जेफ्री एपस्टीनची आत्महत्या की हत्या हे अजूनही गूढ आहे. जनतेच्या दबावामुळे अमेरिकेच्या संसदेला एपस्टीन फाईल्स रिलीज कराव्या लागल्या. मोदी आणि एपस्टीनच्या नात्यावर सरकारने खुलासा करावा.

       

एपस्टीन फाईल्समध्ये केंद्रीयमंत्र्यांचंही नाव पुढे आलेलं आहे. मात्र याबाबत सरकार पुढे येऊन खुलासा करत नाहीय. तसेच यामध्ये आमचा काही संबंध नाही, असंही कोणी म्हटलेलं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

येत्या १९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते, असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं.

पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचा ही दाखला चव्हाणांनी दिला. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे.

त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या १९ डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. असा दावा चव्हाणांनी केला. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं होतं. मात्र १९ डिसेंबर रोजी उलटूनही देशाचा पंतप्रधान न बदलल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना ट्रोल करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!