राजेंद्र हगवणेला थार देणाऱ्या चोंधे कुटुंबाचं पितळ उघडं, पोरांना बायकांचा नाद, हुंड्यासाठी सूनेचा छळ अन्…, उडाली खळबळ

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या गाडीच्या मालकाबाबतची माहिती समोर आली आहे. त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान संकेतची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयशची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे. चोंधे घरातील सुनेचा देखील पैशांसाठी आणि हुंड्यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
वीस लाख हुंड्यासाठी सुयशच्या पत्नीचा छळ केला. तिनं त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्याचबरोबर या त्रासानंतर तिनं महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती.
सुयशची पत्नी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, नवरा सुयश चोंधे याच्यासह घरातील सर्वांनी छळ केला. त्यांनी पैशांसाठी मानसिक, शारिरीक छळ केला आहे. माहेरून पैसे घेऊन ये म्हणून त्रास देत होते. मुलगी झाली म्हणून देखील त्यांनी त्रास दिला होता. मुलगी झाली तेव्हापासून सासरच्यांनी काहीही तिचं पाहिलं नाही. माझ्या माहेरून तीचं शिक्षण आणि बाकी खर्च केला जातोय.
सुयश चोंधेच्या पत्नीने खडक पोलिस ठाण्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीनंतर देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. राजेंद्र हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्री संबंध आहेत. मी नोव्हेंबरपासून माझ्या माहेरी आहे. त्यामुळे मला तिकडची आत्ताची जास्त माहिती नाही. पण, हगवणे आणि चोंधे कुटुंबाचे मैत्रीसंबंध आहेत, अशी माहिती सुयश चोंधेच्या पत्नीने दिले आहेत.
सासरचे शारिरीक मानसिक छळ करायचे. घरामध्ये वारंवार वाद व्हायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत दारू प्यायचे. मुलींना घेऊन फिरायचं, हेच त्यांचं रूटीन होतं. शीतल उभे नावाची एक महिला आहे, ती मुळशीतील पोरांना मुली पुरवते असा धक्कादायक खुलासा देखील सुयश चोंधेच्या पत्नीने केला आहे. शीतल उभे नावाची महिला त्यांना मुलींचे फोटो पाठवायची, मग ते सिलेक्ट करून सांगायचे, त्यांना मुलींचा भरपूर नाद होता.
ती उभे नावाची महिला मुली पाठवायची हे मला माहिती होतं. मीमोबाईलमध्ये पाहिलं होतं. ते सगळं पाहिल्यानंतर मी त्याचा स्क्रिनशॉट काढून घेतला होता. सासू, सासरे, दीर आणि नवरा त्रास द्यायचे. मी महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती. मात्र तिकडून देखील मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असंही सुयश चोंधेच्या पत्नीने सांगितले आहे. चोंधेची आई गावची उपसरपंच होती. तिने आधी निवडणुका लढल्या आहेत. चोंधेंची पार्श्वभूमी देखील राजकारणातील आहे.