देशात दूध उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रांने वाढवलं बजेट, ‘एवढ्या’ कोटींची केली तरतूद..

नवी दिल्ली : दूध उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या दोन योजनांसाठी बुधवारी ६१९० कोटी रुपयांचा निधी वाढवला. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारित राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि राष्ट्र दूध विकास कार्यक्रम यांना मान्यता दिल्याची माहिती प्रसारण आणि मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
तसेच दूध उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी दोन्ही योजनांचा एकूण खर्च आता ६१९० कोटी रुपये असेल. याबाबत तरतूदही करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पशुधन क्षेत्रातील वाढीस चालना देण्यासाठी सुधारित आरजीएमला मान्यता दिली आहे.
सुधारित आरजीएम केंद्रीय क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेचा एक भाग म्हणून १००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधी लागू केला जात आहे. सध्या दुधाची उपलब्धता वाढत आहे. हा उपक्रम डेअरी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ज्यामुळे या क्षेत्राची सलग वाढ आणि उत्पादकता सुनिश्चित केली जाते.
दरम्यान, राष्ट्रीय गोकुळ मिशनची अंमलबजावणी आणि सरकारच्या इतर प्रयत्नांमुळे गेल्या १० वर्षांत दूध उत्पादनात ६३.५५ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.