गावगाड्यात प्रचाराचा धुरळा उडणार! ग्रामपंचायती आधी ‘या’ सत्ताकारणासाठी निवडणूक रंगणार..


मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकानंतर आता गावगाड्यात पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार आहे. ग्रामपंचायती आधी महत्त्वाच्या असणाऱ्या सहकारी संस्थाच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील अर्थकारणाच्या दृष्टीने या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे 11 हजार 41 सहकारी संस्थांमधील राजकीय वातावरण आता तापणार आहे.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी रखडलेल्या निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच या निवडणुका होणार आहेत.

गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेल्या ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, अशा संस्था वगळून इतर सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबवण्यात आली होती, त्याच टप्प्यापासून ती पुन्हा सुरू केली जाणार आहे.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्राधिकरणाने महत्त्वाचे निकष लावले आहेत. त्यानुसार अ’ आणि ‘ब’ वर्गातील ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला होता, त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियमांनुसार सुधारित कार्यक्रम तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठवायचा आहे. आता पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक रंगणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!