दादांना केलेला फोन शेतकऱ्यांच्या हितासाठी, माझ्यामुळे उशीर झाल्याचा आरोप दुर्देवी…; प्रफुल्ल पटेलांच स्पष्टीकरण

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी त्यांना विदर्भातील एका नेत्यांने फोन केला होता,अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना केलेल्या फोनवरून सुरू असलेल्या अपप्रचारावर स्पष्टीकरण दिले आहे.

दिवंगत अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत स्पष्ट सांगितले आहे की, मी दिल्लीत होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या धानाच्या चुकाराच्या संदर्भात मी त्यांना फोन केला होता.मात्र मला अजित दादा नेमके कोणत्या शहरात आहेत हे माहिती नव्हते. या फोनचा मुख्य उद्देश पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या शासकीय धान खरेदीचे प्रलंबित चुकारे लवकरात लवकर मिळावेत, ही सूचना देण्याचा होता. हे चुकारे अनेक दिवसांपासून थकीत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यावर दादांनी त्यावर सुकाऱ्यांची व्यवस्था करतो असं म्हटलं.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या फोनमुळे अजित दादा उशिरा गेले किंवा काही विपरीत घडले, असा समज पसरवण्याचे प्रयत्न दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या कथित विमान अपघाताची घटना ही देश आणि महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आणि शोकाची बाब आहे. मात्र, अशा गंभीर घटनेला सामान्य लोकांसाठी केलेल्या कामाच्या फोनशी जोडून अपप्रचार करणे अत्यंत खेदजनक आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

मी फार जबाबदारी व्यक्त असून राजकारणात अनेक वर्षापासून आहे.त्यामुळे मी फार संयमाने बोलेल आणि माझ्याकडे जोपर्यंत पुरावा येणार नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही असेही त्यांनी म्हटलं. अजितदादानां आपला फोन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी होता, असे पुन्हा प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे.