महापालिका निवडणुकांचा धुरळा!फक्त 48 तास बाकी, उमेदवारांची धाकधूक वाढली, कुठे किती अर्ज दाखल?


पुणे :राज्यात नगरपरिषद- नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.२९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ 48 तास बाकी आहेत.पुणे, नागपूर आणि मालेगावमध्ये अर्जांची विक्रमी विक्री झाली असली तरी अजूनही इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरताना दिसत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात आतापर्यंत ९,१७१ पेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली आहे.परंतु शनिवार अखेर केवळ ३८ जणांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले आहेत. येत्या मंगळवारी ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. आज रविवार (२८ डिसेंबर) सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उद्या सोमवार आणि परवा मंगळवार असे केवळ दोनच दिवस उमेदवारांकडे शिल्लक आहेत.

पुणे, नागपूर आणि मालेगावमध्ये अर्ज विक्रीचा आकडा हजारोच्या घरात आहे. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांनी अद्याप सावध भूमिका घेतली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवार याद्या आणि ए बी फॉर्मचे वाटप पूर्ण न केल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

       

दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंकडून अधिकृत उमेदवारांची यादी गुलदस्त्यात आहे. वेळेआधी नावे जाहीर केल्यास नाराज इच्छुक उमेदवार अपक्ष किंवा विरोधी पक्षात जाऊन बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने पक्षांनी ही सावधगिरी बाळगली आहे.

नागपूर महानगरपालिकेत १५१ जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे ४ दिवसांत केवळ २१ अर्ज आले आहेत तर मालेगावमध्ये ८४ जागांसाठी राजकीय रणसंग्राम सुरू आहे. या अर्ज विक्रीतून महापालिकेला आतापर्यंत २.६२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. १३८१ अर्ज विक्री झाले असून ७१८ इच्छुक शर्यतीत आहेत. या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!