बैलाने काढला सगळ्या गावकऱ्यांचा घाम! घराच्या छतावर चढला बैल अन्..
पिलीभीत : सध्या एका प्राण्याचा व्हीडीओ समोर आला आहे. या व्हीडीओत चक्क बैल घराच्या छतावरच चढला आहे. यामुळे याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
गावकऱ्यांनी तो सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करत तो व्हीडीओ व्हायरल केला आहे. मोठ्या अथक प्रयत्नांनंतर तो बैल खाली उतरवण्यात यश आले आहे. गावकऱ्यांनी जीव मुठीत धरून त्या मुक्या जीवाला खाली उतरवल आहे.
या बैलाला खाली घेण्यासाठी अनेकांची दमछाक झाली होती. उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये हा प्रकार घडला आहे. या बैलाला बघण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या बैलाला पाहण्यासाठी घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घरावर हा बैल चढलाच कसा असेल. या विचाराने लोक हैराण झाले. वरती जाण्यासाठी चांगलं सोय देखील नव्हती.
परंतु या बैलाला सुखरूप खाली उतरवण्यात गावकऱ्यांना यश आल आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेक ठिकाणी प्राणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतात.
यामुळे त्यांचे हे प्रकार कॅमेऱ्यात कैद होतात. काही दिवसांपूर्वी हत्ती देखील रोडवरून एकाच लाइनमध्ये जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.