राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली, शिंदे सरकारचा लागणार कस…!
the budget session of the state

मुंबई : राज्यात नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प कधी सादर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.
सध्या पदवीधर निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या तसेच पोट निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर आता राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यामुळे याकडे काय सवलती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशाचा अर्थसंकल्प देखील नुकताच सादर करण्यात आला.
आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या नवीन अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.