निर्घृण कृत्याने राज्य हादरले; सहावीतील विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, आरोपी अद्याप मोकाट…


अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.

वडगाव पान येथील शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना हा प्रकार घडला. रस्त्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला अडवले आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून पळ काढला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकली मुलीदेखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला असून, जखमी मुलीचा जबाब तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हल्ल्यामुळे धक्का बसलेल्या या बालिकेने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत हल्लेखोर पूर्णपणे अनोळखी असल्याचे स्पष्ट केले आहे. या संतापजनक घटनेची माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली आहे.

घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि पीडितेचा अधिकृत जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध विशेष पथके स्थापन केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. याशिवाय, संबंधित विद्यार्थिनी शिकत असलेल्या शाळेतही चौकशी करण्यात येत असून तपास अधिक सखोल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!