प्रियकर निघाला हैवान! प्रेयसीला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं अन्….. केलं धक्कादायक कृत्य


ठाणे : सोशल मीडियावरून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणुकीचे प्रकार सध्या वेगात वाढत आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. वर्षीय तरुणीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. तिच्यावर अत्याचार करून खासगी व्हीडिओ, फोटो काढले आणि ते नातेवाईक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केले.

प्रियकरच हैवान असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट पोलिसांत धाव घेतली. ही घटना भिवंडीत घडली आहे. निखिल गोविंदसिंग गौतम असे 26 वर्षीय प्रियकराचे नाव आहे. तो काल्हेर परिसरात राहत असून त्याने एका तरुणीशी मैत्री केली.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून १६ जून ते जानेवारी अशा काळात तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केले. या काळात खासगी क्षणांचे गुपचूप फोटो आणि व्हीडिओ काढले.

दरम्यान, निखिलने ते फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर ही बाब तरुणीच्या लक्षात आली. आपली फसवणूक करून बदनामी केल्याचे लक्षात येताच तरुणीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी निखिलवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!