मुलीवरची काळी जादू काढतो म्हणत टाकला डाव! भोंदूबाबाने महिलेला लावला २९ लाखांना चुना, पुण्यातील धक्कादायक प्रकार.


पुणे : मुलीवरची काळी जादू काढतो म्हणत ज्येष्ठ महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. भोंदूबाबाने ज्येष्ठ महिलेला २९ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

हि घटना पुण्यातील बालेवाडी भागात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेसोबत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांकडून भोंदूबाबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालेवाडी परिसरात राहत असलेल्या ज्येष्ठ महिलेला डिसेंबर महिन्यात एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. यावेळी त्या व्यक्तीने तुमच्या घरावर दोष असल्याचे सांगितले.

यावेळी त्या भोंदूबाबाने त्या महिलेला तुमच्या घरावर वास्तुदोष आहेत. तसेच तुमच्या मुलीमधील दोष काढून देतो अशी खोटी बतावणी केली. महिलेला पुढे कथित जादूटोणा करत जाळ्यात ओढलं. तिला काळी जादू काढून देतो, असे सांगितले.

त्याकरिता घरावर असलेले संकट दूर करण्यासाठी काही पूजा कराव्या लागतील, असे सांगून महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे देण्यास सांगितले. महिलेने आरोपीच्या बँक खात्यात वेळोवेळी २८ लाख ७७ हजार रुपये जमा केले.

मात्र त्यानंतर जेव्हा त्या महिलेने त्या व्यक्तीला संपर्क करायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र समोरून काही उत्तर आलं नाही. आपली फसवणूक झाली आहे. लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेतली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!