वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची! नवले पुलावरून जाताना कारची बसला धडक, दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी..


पुणे : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू आहे.

स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. आज (ता.२५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पूल हा रहदारीचा रस्ता आहे. यावरून दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते. अशातच शनिवारी पहाटे एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. पहाटे पाचच्या सुमारास एमएच १२ केडब्ल्यू ३६६३ ही स्विफ्ट कार नवले पुलावर भरधाव आली आणि या बसला मागून जोरात ठोकली.

कारचा वेग इतका होता की कारचा पुढचा भाग काहीसा बिघडला. या कारमधून प्रवास करणारे मित्रमंडळी हे वाढदिवसाची पार्टी करून परतत होते. कारमधील सहा जणांपैकी दोन जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले.

तेथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी या चार जखमी युवकांना आधी नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पुढे त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!