लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर! अदिती तटकरे यांनी दिला मोठा दिलासा, योजनेबाबत मोठी अपडेट समोर…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाल्याचं पहायला मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं.

मात्र, योजनेच्या अंमलबजावणीत काही महिलांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचे प्राथमिक निरीक्षणातून समोर आल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे लाभ देण्याची प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने e-KYC बंधनकारक केली.

पण गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये “५१–५२ लाख महिला अपात्र” अशा बातम्या मोठ्या प्रमाणात झळकल्या. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये टेन्शन निर्माण झालं होतं.
या चर्चांवर अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्राथमिक छाननीत ५२ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या” अशा प्रकारची कोणतीही बातमी खरी नाही. प्रसार माध्यमांवर अशा बातम्या दिसत असल्या तरी त्या पूर्णपणे निराधार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
त्यांच्या म्हणण्यानुसार, e-KYC प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि ती पारदर्शकता वाढवण्यासाठी राबवली जात आहे. या प्रक्रियेचा उद्देश लाभार्थींना अडचण निर्माण करण्याचा नसून, पात्र महिलांना नियमितपणे निधी मिळावा, याची खात्री करण्याचा आहे. त्यामुळे कोणतीही महिला अचानक योजनेतून अपात्र ठरली आहे, असे मानण्याचे कारण नाही.
माध्यमांमधील अप्रामाणिक बातम्यांमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं संभ्रमाचं वातावरण आदिती तटकरेंच्या या स्पष्टीकरणामुळे दूर होणार आहे. अनेक महिलांना वाटत होते की, e-KYC मध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाईल. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही अंतिम यादी सरकारने जाहीर केलेली नाही.
