राजकीय भूकंप! अजित पवारांना सर्वात मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी…

नाशिक : एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा दणका दिला आहे, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून कोकाटे यांनी उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती, मात्र त्यांना हाय कोर्टाकडून सध्या तरी कोणताही दिलासा मिळालेला नाहीये, हाय कोर्टानं या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
या प्रकणावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांकडे माणिकराव कोकाटे यांच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झाली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

अटक वॉरंट जारी झाल्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे ते सध्या मोठ्या अडचणीत सापडले असून राजकीय भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक रणधुमाळी सुरू होत असताना पक्षातील महत्त्वाच्या नेत्यावर अटक वॉरंट निघणे, हे पक्षासाठी प्रतिकूल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटात माणिकराव कोकाटे यांच्याकडे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांतील निवडणूक नियोजनाची मोठी धुरा त्यांच्या खांद्यावर होती. याशिवाय ते नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असून इतर तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
