केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठा निर्णय, २०२७ मध्ये देशभरात २ टप्प्यात जनगणना होणार, अन् त्यानंतर…


नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जनगणनेबाबत निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून जनगणना प्रलंबित आहे.

त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने जनगणना व्हावी आणि ती जातनिहाय व्हावी, अशी मागणी केली जात होती. अखेर विरोधकांची ही मागणी मान्य झाली आहे. देशभरात आता जनगणना होणार आहे.

दरम्यान, २०२७ मध्ये देशभरात दोन टप्प्यात जनगणना होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत जनगणना करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार देशभरात दोन टप्प्यात जनगणना होणार आहे. विशेष म्हणजे या जनगणनेसाठी 11 हजार 718 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, आता २०२७ मध्ये जातनिहाय सविस्तर जनगणना होईल. यानंतर नव्याने मतदारसंघाची बांधणी होईल. या काळात नव्या मतदारसंघांची देखील रचना होईल. त्यामुळे ही जनगणना जास्त महत्त्वाची आहे.

या जनगणनेत देशात कोणत्या भागात कोणत्या समाजाचं वास्तव्य आहे, तसेच विविध समाजाची नेमकी काय लोकसंख्या आहे, याची देखील इत्यंभूत माहिती मिळणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आजच्या मंत्रिमंडळात घेतलेला निर्णय हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मानलं जात आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. “२०२७ ची राष्ट्रीय जनगणना दोन टप्प्यात केली जाईल. पहिला टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना समाविष्ट आहे. हा टप्पा एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे.

तर दुसरा टप्पा हा फेब्रुवारी २०२७ मध्ये होईल. या टप्पा लोकसंख्या गणनावर केंद्रीत राहील. पण बर्फवृष्टी झालेल्या भागात सप्टेंबर २०२६ मध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील”, अशी महत्त्वाची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. विशेष म्हणजे ही पहिली डिजीटल जनगणना असेल, अशी महत्त्वाचीदेखील माहिती त्यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!