लाडक्या बहिणींसाठी आजवरची सर्वात मोठी घोषणा! बजेट सादर करताच देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अजित पवार यांच्या निधनानंतर नवनियुक्त अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २०२५-२६ या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या चार स्तंभांवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित आहे. यामध्ये 16 उपक्षेत्रांचा समावेश असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना पुढील आर्थिक वर्षातही सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावर विरोधकांनी लगेच महायुती सरकारने लाडक्या बहिणींचे अनुदान 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याच्या दिलेल्या आश्वासनाबद्दल विचारले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, काळजी करु नका तुमच्या मनातील गोष्टी आम्हीच पूर्ण करणार.
वेळ आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, फक्त कोर्टात जाऊ नका, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज्यात सध्याच्या घडीला 37 लाख लखपती दीदी आहेत. आणखी 25 लाख बहिणींना लखपती करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.