तुम्ही माझ्या अधिकारात हस्तक्षेप करु नका ; सरन्यायाधीशांनी वकिलास सुनावले! पहा न्यायालयात काय घडले?
मुंबई : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची गणना शिस्तप्रिय न्यायाधीशांमध्ये केली जाते. गेल्या एका सुनावणीदरम्यान त्यांना न्यायालयात येण्यास थोडासा उशीर झाल्यामुळे त्यांनी माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी आज एका वकिलाला न्यायालयात समज दिली आहे.
याचदरम्यान एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १७ एप्रिल रोजी सूचीबद्ध केली होती. सुनावणीसाठी आधीची तारीख मिळविण्यासाठी वकिलाने दुसर्या खंडपीठासमोरील प्रकरणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तुम्हला पूर्णपणे माफ केले आहे ;पण मलाही माफ करा, मी तुम्हाला सुनावणीची तारीख दिली आहे. तुम्ही माझ्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु नका, अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणी तारखेबाबत संभ्रम निर्माण करणार्या वकिलांना सुनावले आहे.