नाशिकमध्ये ‘रायगड ग्रुपच्या लावणी महोत्सवासाठी’ झळकले ‘सबसे कातील गौतमी पाटील’ चे बॅनर…!


नाशिक : युवकांपासून अगदी म्हाताऱ्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमी पाटीलचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच काही दिवसाआधी गौतमी पाटीलचा  एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. अशातच गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव नाशिक जिल्ह्यातील निफाड इथे आयोजित करण्यात आला आहे.

निफाड च्या रायगड ग्रुपच्या माध्यमातून लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लावणी महोत्सव निफाड शहरातील बस स्टँडशेजारी मार्केट यार्ड परिसरात होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. गौतमी पाटील म्हटल्यावर तुफान गर्दी होणारच, म्हणून या महोत्सवासाठी तिकीट ठेवण्यात आले आहेत. यात 200 रुपये, 500 रुपये, एक हजार रुपये असा लावणी महोत्सवाचा तिकीट दर असणार आहे.

दरम्यान हा कार्यक्रम सायंकाळी साडे चार वाजता सुरु होणार असल्याचे समजते. त्यामुळे लावणी महोत्सवाला चांगलीच गर्दी होणार असल्याचे दिसते. मात्र कार्यक्रमात गर्दी एवढी होते की, पोलिसांना आवरणे कठीण होऊन बसते. आता नाशिक मध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटील येणार असल्याने तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा होत आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!