वातावरण तापलं ; शिंदेंच्या आमदाराने बोगस मतदार आणले? फडणवीसांच्या मंत्र्याचा गंभीर आरोप


पुणे : राज्यातील विविध भागांमध्ये आज 2 डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळातील मंत्री आकाश फुंडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर बोगस मतदार आणल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा नगरपालिकेसाठी होत असलेल्या मतदानासाठी ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने बोगस मतदार शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आणले असल्याचा गंभीर आरोप कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केला आहे.निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणेने बोगस मतदारांचे प्रकरण कठोरपणे हाताळले पाहिले आणि मतदारयाद्या तपासून मतदारांची पडताळणी केली पाहिजे. शक्य झाले तर बोगस मतदान ज्या ज्या ठिकाणी झाले आहे, तेथील निवडणुका रद्द करा किंवा पुर्नमतदान घ्या, अशी मागणी आकाश फुंडकर यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील यावरून टोला लगावला आहे. सत्ताधारी लोक सातत्याने बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया प्रभावित करत असून आयोग मात्र झोपा काढत आहे. मालकांविरोधात काहीच करायचं नाही, हे आयोगाने ठरवलंय का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!