वातावरण तापलं! हत्या, खंडणी, मोक्का… तरीही भाजपमध्ये एन्ट्री! कुख्यात मयूर शिंदेचा पक्षप्रवेश


मुंबई :राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना ठाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबई–ठाणे परिसरातील विविध गुन्ह्यांमध्ये नाव असलेला कुख्यात गुंड मयूर शिंदे याने अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या मयूरचा भाजप प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.

मयूरवर कोणत्या गुन्ह्याची नोंद?

मयूर शिंदे याच्यावर हत्या, खंडणी, पोलिसावर हल्ल्याचा प्रयत्न तसेच हत्येचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. २०११ साली त्याच्याविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच २०२३ मध्ये खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीप्रकरणीही शिंदेला अटक करण्यात आली होती. मयूर शिंदे हा मुंबई आणि ठाण्यातील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी आहे. मयूर हा पूर्वी भांडूपमध्ये राहत होता. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात राहायला आला. आता त्याने भाजप पक्ष प्रवेश केला आहे.

दरम्यान एका बाजूला राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे ‘पार्टी विथ डिफरन्स’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपाने मुंबई-ठाणे परिसरातील विविध गुन्ह्यांमध्ये नाव असलेला कुख्यात गुंड मयूर शिंदे याचा अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मयूर शिंदे हा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!