वातावरण तापलं! एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशाच्या मोठ्या बॅगा आणल्या; ठाकरे गटाच्या नेत्याच्या आरोपाने खळबळ.


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मालवणमध्ये एकनाथ शिंदे यांनीच पैशाच्या मोठ्या बॅगा आणल्या होत्या, पैसे वाटूनच हे लोक जिंकले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.त्यांच्या या आरोपमुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.
.
माजी आमदार वैभव नाईक यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत पुरावा दिला आहे. त्यासोबतच त्यांनी काही सविस्तर माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आले होते, असा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.एकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले. परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले. तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत. हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत, असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे, असाही आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!