वातावरण तापलं! शाईच्या आरोपानंतर जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आयोगाचा मोठा निर्णय ; यापुढे मार्कर वापरला जाणार…..


पुणे: राज्यातील महापालिका निवडणूकीसाठी मतदान सुरू असताना मतदारांच्या बोटाला शाई ऐवजी मार्कर वापरण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. यावरून विरोधकाकडून सरकारसह निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करण्यात आली.यानंतर आता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी इंडेलिबल इंकच वापरण्यात येणार आहे. तेव्हा मार्करचा वापरण्यात येणार नाही. असे आयोगाने स्पष्ट केला आहे तसेच निवडणूक आयोगाने सांगितले की, अशा पद्धतीने शाई पुसणे हा देखील एक गुन्हा आहे. बोटावरील शाई पुसून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणे हे चुकीचे कृत्य आहे, असे आयोगाने निवेदन जारी करून म्हटले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मार्करचा वापर केला जाणारच नाही. जर कोणी बोटावरील शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करत आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. जर कोणी बोटावरील शाई पुसून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित मतदार पुन्हा मतदान करू शकणार नाही. असा आयोगाने स्पष्ट केलं.

2011 च्या आदेशानुसार,मतदारांच्या बोटांवर शाईसाठी मार्कर पेन वापरण्यात येत आहेत. तसे आदेश जारी करण्यात आले होते. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शाईसाठी मार्कर पेन वापरला जात आहे. या आदेशांनुसार, शाई मार्कर पेनने अशा प्रकारे लावावी की ती मतदाराच्या बोटावर स्पष्टपणे दिसेल.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सर्वांना शाई पुसण्याचा प्रयत्न करून कोणताही त्रास निर्माण करू नये असे आवाहन केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!