वातावरण तापलं! महायुतीचे 67 नगरसेवक चौकशीच्या फेऱ्यात, निवडणूकही न्यायालयीन कचाट्यात अडकणार?


पुणे : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीच बिगुल वाजला असताना राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीपूर्वी 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. याविरोधात आता विरोधकांनी शड्डू ठोकले आहे. मनसे बिनविरोध नगरसेवकांविरोधात हायकोर्टात धाव घेणार आहे.त्यामुळे बिनविरोध नगरसेवक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. तसेच ही निवडणूक न्यायालयीन कचाट्यात अडकणार? असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे जवळपास 67 नगरसेवक बिनविरोध जिंकले आहेत. याच मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकार तसेच निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत आरोप केला आहे.दबाव आणून आणि पैसे वाटप करून इतरांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बिनविरोध उमेदवाराविरुद्ध आता मनसे कोर्टात जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली,पिंपरी-चिंचवड,जळगाव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या संख्येने सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. याठिकाणी दबावामुळे माघार घ्यावी लागल्याचा दावा काही विरोधकांनी केला आहे.याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगानेही थेट चौकशीचे आदेश दिले आहेत. उमेदवारी मागे घेण्यामध्ये दबाव, धमकी आणि आमिषांचा वापर झाला का याची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमण्यात आला आहे.

याप्रकरणी आता मनसे न्यायालयात जाणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल आता राज्य निवडणूक आयोगानेही घेतल्याचे दिसते. त्यामुळे याप्रकरणी महापालिका निवडणूकही न्यायालयीन कचाट्यात अडकणार का, असा सवाल केला जात आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!