मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; जितका त्रास मराठ्यांना द्याल तितका…., जरांगेचा थेट कोणाला इशारा?


पुणे: मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या लढ्याला अखेर यश आलं. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझिटिअरचा जीआर काढला. आता मराठा आरक्षण जीआर रद्द करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी रान पेटवल आहे. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी गरज पडली तर दिल्लीपर्यंत लढा देण्याचा निर्धारही भुजबळांनी व्यक्त केला आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना थेट इशारा दिला. जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसतील असा इशारा त्यांनी दिला.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांनी कधी कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. पण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध होत असेल तर मग मराठे पण त्याता उत्तर देणार हे जरांगे यांनी ठणकावले.मराठा जीआर हा ओबीसी आरक्षणाला धक्का देणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर भुजबळांना काय करायचं ते करुद्यात, त्याची काही अडचण नाही. असे तुटक उत्तर जरांगे यांनी दिले आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा वादळ दिल्लीत धडकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. ओबीसी प्रवर्गातूनच मराठा बांधवांना आरक्षणावर जरांगे ठाम आहेत. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटनुसार, राज्य सरकारने कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांच्या कुणबी नोंद करायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही मराठा बांधवांना याविषयीचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहेत.

दरम्यान दुसरीकडे हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या काही याचिका कोर्टासमोर टिकल्या नाहीत. पण याप्रकरणात ओबीसी आणि मराठा समाजात कटुता आणण्याचे प्रयत्न होताना ही दिसत आहेत. मात्र आता जरांगे पाटलांनी जितका त्रास मराठ्यांना दिला तेवढं मराठे खोलात घुसतील असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!