‘तुंबाडची मंजुळा ‘चा धम्माल टीझर प्रदर्शित!मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशीची कोकणातली हॉरर स्टोरी


पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा आता रहस्यमय आणि उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित झाला आहे. या धम्माल टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सिनेमात सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीझरमध्ये ‘मंजुळा’ या नावाभोवती तयार झालेलं गूढ वातावरण, गावकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि त्यांची उडालेली तारांबळ प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. कोकणातील एका गावात घडणाऱ्या अद्भुत घटनेवर आधारित ही कथा असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे मूळ चित्रपट केवळ सुमारे पाच कोटी इतक्या बजेटमध्ये तयार झाला होता. तर बॉक्स ऑफिसवर या सिनेमांना तब्बल 125 कोटींची कमाई करत यश मिळवल आहे.

गावातील विविध व्यक्तिरेखा आणि त्यांची अतरंगी शैली यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, अथर्व रुके, प्रियाल नाईक आणि उषा नाडकर्णी यांसारखी कलाकारांची भक्कम फौज दिसणार आहे.

विशेषतः भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे यांचा लूक आणि संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.टीझरच्या शेवटी अर्धवट बंद दाराआड उभी दिसणारी सई ताम्हणकर ही सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. तिची भूमिका नेमकी काय असेल, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.

झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तुंबाडची मंजुळा’ हा चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!