घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार; पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी मोठा डाव, अमोल कोल्हेंनीही स्वीकारलं ‘घड्याळ’, नेमकं काय घडतंय?


पुणे : महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता त्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर येत आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाची ‘तुतारी’ शांत होणार असून, सर्व उमेदवार अजित पवार यांच्या ‘घड्याळ’ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या राजकीय आखाड्यात अजित पवारांनी आपली पकड घट्ट करत शरद पवार गटाला ‘घड्याळा’च्या चिन्हाखाली एकत्र आणण्यात यश मिळवले असल्याची माहिती मिळाली आहे,

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या घडामोडीनुसार, शरद पवार गटाची ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही निवडणूक चिन्ह यावेळी प्रचारातून गायब राहणार असून, सर्व उमेदवार अजित पवार गटाच्या ‘घड्याळ’ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये हा प्रयोग राबवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आगामी निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हावरच लढण्याची भूमिका जाहीर केल्याने या एकत्रिकरणाला अधिक बळ मिळाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमधील अनुभव लक्षात घेता, सत्तेसाठी आणि विजयासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा व्यवहार्य निर्णय घेतल्याचे चित्र आहे.

महापालिका निवडणुकांत अजित पवार गटाने पुण्यात 27 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 37 जागा जिंकत मोठे यश मिळवले होते. त्याउलट शरद पवार गटाला पुण्यात अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले, तर पिंपरी-चिंचवडमध्ये खातेही उघडता आले नाही. या निकालांनंतर अजित पवारांनी दोन्ही गटांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून, एकप्रकारे संपूर्ण निवडणूक रणनिती त्यांच्या हातात असल्याचे स्पष्ट होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!