GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर तुकाराम बीज सोहळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, जाणून घ्या…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांनी तुकाराम बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. यामुळे याबाबत सुचना जारी करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीचे पाणी पिऊ नये किंवा वापरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे.
GBS हा दुषित पाण्यामुळे पसरणारा गंभीर आजार असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व वापरण्यास मनाई केली आहे. वारकऱ्यांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी याच दिवशी सदेह वैकुंठ गमन केले होते, त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. या पवित्र सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात. हे वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून पालखी सोहळ्यात सहभागी होतात.
दरम्यान, पुण्यात GBS ने थैमान घातल्याचे दिसून आले. पुण्यात सर्वाधिक याचे रुग्ण आढळले. तर, काही जणांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. दूषित पाणी पिल्याने हा आजार होत असल्याचे दिसून आले आहे. या आजारामागील प्रमुख कारण हे दूषित पाणी ठरले आहे. यामुळे याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे.
त्यामुळे प्रशासनाने वारकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. याठिकाणी लाखो भाविक दाखल होणार आहेत.