जुन्या भांडण्याच्या वैमनस्यातुन तरुणाचा खुन करणारे आरोपी १२ तासात केले जेरबंद…

लोणी काळभोर : जुन्या भांडण्याच्या वैमनस्यातुन ७ जनांनी एका तरुणाला लाथा बुक्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घालुन निघृण खून करण्यात आला आहे. यांतील ३ आरोपींना १२ तासात पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१, रा. फुरसुंगी, पुणे) याचा खून झाला आहे. त्याचा खून केला असल्याच्या कारणावरून आदित्य सुभाष गायकवाड, (वय १९, रा. गोकुळनगर, कोंढवा, पुणे), गणेश किशोर मोरे (वय २०, रा. कात्रज, कोंढवा) व कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे (वय १९ वर्षे, रा. तुळजाभवानी निवास, कोंढवा, पुणे.) यांना अटक करण्यात आली आहे.
सदर घटना गुरुवारी रात्री येवलेवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीतील येवलेवाडी कमानीच्या पुढे, मिनू मेहता सोसायटीकडे जाणारे कच्च्या रोडवर घडली आहे. या ठिकाणी जुन्या भांडण्याच्या कारणावरुन आकाश चाबुकस्वार हा पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या सात जनांनी त्याचा रस्ता आडवून त्याला थांबवले. व वाद घालुन आकाश यांस लाथा बुक्यांनी मारहाण केली. तो रस्त्यावर खाली पडलेनंतर त्याच्या डोक्यात दगड घालुन निर्घृणपणे निघृण खून करुन सर्वजन तेथून पळून गेले.

याप्रकरणी आकाशच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यांवरून गुन्हा दाखल होताच गंभीर गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींच्या शोध घेणे बाबत पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर यांनी तात्काळ तपास पथकाच्या दोन टिम तयार करुन पाहिजे आरोपींचे शोध घेणे कामी रवाना केल्या. तपास पथकातील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव व अमंलदार सुजीत मदन यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आदित्य गायकवाड, गणेश मोरे व कौशल्य मारे यांना लागलीच ताब्यात घेतले. इतर चार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमर काळंगे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सुषमा हिंगमिरे, संदिप पवार, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, विजय खेगरे, अनिल बनकर, मयुर मोरे, अमोल तावरे व अक्षय शेंडगे यांनी केली.