लोणीकाळभोर येथे घरफोड्या करुन फरार झालेल्या आरोपीस मध्यप्रदेशमधून अटक! सहा लाख रुपये, सोन्याचे दागिने अनेक ऐवज हस्तगत…


लोणी काळभोर : घरफोडी करून फरार झालेल्या परप्रांतीय अट्टल गुन्हेगारांस पोलीसांनी ९ दिवसांचे आत अटक करून त्याच्याकडून ६ लाख ३९ हजार ९०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी प्रतिक हिराचंद लिडकर वय ३१ रा. शिवमंदिर शेजारी रामनगर, खंडवा, ता. जि. खंडवा, मध्यप्रदेश राज्य याला खंडवा, मध्यप्रदेश येथुन अटक करण्यात आली आहे.

शौकत शब्बीर मोगल (वय ४३ वर्षे रा. गल्ली नंबर २, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) हे दिनांक १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारांस त्यांचे कुटुंबीयांसह त्यांचे राहते घरास कुलुप लावुन आपल्या आईच्या ४० व्या च्या विधीसाठी आपल्या मुळ गावी बार्शी येथे गेले होते. ते १४ जुलै रोजी कदमवाकवस्तीत येथे परत आले असता, त्यांचे राहते घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत तसेच त्यांचे घरातील लोखंडी कपाटाचे व आतील तिजोरीचे लॉक उचकटलेले व त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कमची पाहणी केली असता २७ हजार ३०० रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची वेढणी, ३२ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची वेढणी, २४ हजार ८०० रुपये किंमतीची चार ग्रॅम वजनाची वेढणी, १६ हजार ८०० रुपये किंमतीची तिन ग्रॅम वजनाची वेढणी, ४ हजार ५०० रुपये किंमतीची सहा ग्रॅम वजनाची बाळी, ३९ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची कानातील रिंग, ७० हजार रुपये किंमतीचे १२ ग्रॅम वजनाचे कुडके, २ हजार २०० रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची अंगठी, २ लाख रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची पट्टी नेकलेस, ४५ हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची कानातील रिंग, १ लाख रुपये किमतीची ६ .५ ग्रॅम वजनाची कानातील वेल, १ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे नेकलेस, ४५ हजार रुपये किमतीचे ५.५ ग्रॅम वजनाचे पेंडंट, ४ हजार रुपये किंमतीचे ८.५ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन या दागिन्यांसह २ हजार ५०० रुपये रोख रक्कम, ७ हजार रुपये किंमतीचे २ मोबाईल फोन असा एकुण ६ लाख ३९ हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज मिळून आला नाही म्हणून त्याबाबत त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात १५ जुलै रोजी फिर्याद दिलेवरुन, अज्ञात चोरटयाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करणेत आला होता.

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांनी, अज्ञात आरोपीबाबत तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करणेचे दृष्टीने अहोरात्र प्रभावी प्रयत्न केले. तपासादरम्यान पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई पाटील व कुदळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत प्राप्त झाले माहितीचे अनुषंगाने, लोणी काळभोर पोलीसांनी तांत्रीक पुराव्यांची पडताळणी करुन, अज्ञात आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली.

त्यावरुन सदर चोरी प्रतिक लिडकर याने केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन व परवानगीने लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक खंडवा, मध्यप्रदेश येथे तात्काळ रवाना झाले व त्यांनी अतिशय कौशल्यपुर्णरित्या आरोपीची सदर भागातील रहिवासीतांकडुन माहिती घेवुन त्याचेवर निरंतर पाळत ठेवली. आरोपी फरार कालावधीत राहत असलेल्या भागात सापळा रचुन आरोपीस खंडवा, मध्यप्रदेश येथुन२३ जुलै रोजी ताब्यात घेवुन, त्यास दाखल गुन्हयात अटक केले. त्याच्याविरुध्द मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशाप्रकारचे एकुण १५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

लिडकर याच्या अटक मुदतीत, पोलीस कस्टडी दरम्यान तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर यांनी, तपास करुन त्याने गुन्हयातील चोरुन नेलेले सोन्याचे दागीने रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ६ लाख ३९ हजार ९०० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. अशाप्रकारे अतिशय कौशल्यपुर्ण व प्रभावीरित्या तपास करुन लोणी काळभोर पोलीसांनी घरफोडी सारखा गंभिर गुन्हा, बाहेर राज्यातील आरोपी असताना देखील, केवळ ९ दिवसांचे आत उघडकीस आणुन, गुन्हयातील चोरीस गेलेला १०० टक्के माल आरोपीकडुन जप्त केला आहे.

वास्तवीक पाहता सदर गुन्हा अज्ञात आरोपीविरुध्द दाखल असताना तसेच सदर बाहेर राज्यातील आरोपीबाबत काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त नसताना देखील, लोणी काळभोर पोलीसांनी अविरत प्रयत्न व कौशल्यपुर्णरित्या तपास करुन, आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. तसेच आरोपीकडुन चोरीस गेलेला सर्व पैवज जप्त करुन, गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, पोलीस शिपाई विर, पाटील, कुदळे, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, थोरात यांनी तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे कार्यालयास नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई अमोल जाधव यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!